

08857
राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक
सेवा संघाची निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर, ता. ३ : येथील राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची २०२४ ते २०२७ ची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणूक अधिकारी सुरेश शंकर साळवी यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संघाचे संस्थापक व्ही. डी. माने, श्रीकृष्ण शंकर वाघ, डॉ. मानसिंग जगताप, एच. डी. साळुंखे, प्रा.श्रीधर शामराव हेरवाडे यांचे सहकार्य लाभले.
नूतन पदाधिकारी असे ः अध्यक्ष - कावजी धोंडीराम कदम, उपाध्यक्ष - के. बी. गुरव, कार्यवाह - श्रीकांत आडीवरेकर, सहकार्यवाह - अनिता आबासो आवटी, कोषाध्यक्ष - आर. डी. नार्वेकर, अंतर्गत लेखापरीक्षक आर. डी. कांबळे, सदस्य बाजीराव शिपुरे, शोभा पाटील, शोभा पोर्लेकर, बाबूराव पोर्लेकर, रंगराव पाटील, स्वीकृत सदस्य ॲड. बी. आर. मोकाशी, एन. एस. पाटील, सुरेश साळवी.
विविध सामाजिक उपक्रम राबवून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे आरोग्य व जीवन सुखकर होण्यासाठी मोलाचे सहकार्य करण्याचे तसेच संघातील सर्वांना विश्वासात घेऊन संघ प्रगतीसाठी कार्यरत असल्याचे नूतन अध्यक्ष कावजी (बापू) कदम यांनी सांगितले.
संचालक बी. आर. मोकाशी, एन. एस. पाटील, सुरेश साळवी यांनी मनोगत व्यक्त करून संघाच्या विकासासाठी सहकार्य करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली. संघाचे कार्यवाह श्रीकांत आडीवरेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.