अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे
कथाकथन, वकृत्व स्पर्धा

अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कथाकथन, वकृत्व स्पर्धा

Published on

अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे
कथाकथन, वकृत्व स्पर्धा
कोल्हापूर, ता. १९ : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धा १८ डिसेंबरपासून क्रेशर चौक येथील रघुनंदन सांस्कृतिक भवन येथे होणार आहेत. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेच्या परीक्षिका संध्या देशमुख म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यातील सर्व शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा असून ज्युनियर केजी, सीनियर केजी वय वर्षे ४ ते ६ वयोगटासाठी कथाकथन स्पर्धा, १ ली ते ४ थी कथाकथन तसेच ५ वी ते ७ वी व ८ वी ते १०वी या गटांसाठी वकृत्व स्पर्धा होणार आहेत. जिल्ह्यातील शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.’’
स्पर्धेचे विषय असे, वय ४ ते ६ - विषय कोणताही. १ ली ते ४ थी विषय - पौराणिक चातुर्य कथा, ऐतिहासिक शौर्य कथा. ५ वी ते ७ वी विषय - सैनिकी जीवन काळाची गरज, वाचनाची आवड पुन्हा रुजूवुया, साने गुरुजी एक दीपस्तंभ, येरे येरे पावसा व मला पडलेले सुंदर स्वप्न. ८ वी ते १० वी विषय - भारतीय स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारी योगदान, आदर्श गणेशोत्सव,
चौकोनी कुटुंब आणि दुरावलेली नाती, कृत्रिम बुद्धिमत्ता एआय शाप की वरदान, स्त्री सुरक्षित आहे का?, श्रीमान रतन टाटा उत्तुंग व्यक्तिमत्व.
यावेळी संस्था संचालक संदीप देसाई, पूजा देसाई, अभिजीत देसाई, केदार देसाई, सचिव विजया खटावकर, माधवी ढेंगे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com