

09231
पाचगाव परिसरातील समस्यांबाबत
ग्रामसेवकांना ठाकरे गटातर्फे निवेदन
कंदलगाव, ता. ३ : पाचगाव परिसरातील ग्रामस्थांना परिसरात सुरू असणाऱ्या विकासकामांबाबत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने पाचगावचे ग्रामसेवक अजित राणे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, परिसरात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई केली आहे. केबल टाकल्यानंतर ही चर व्यवस्थित भरली नसल्यामुळे चिखलाचे साम्राज्य होते. सध्या धुळीचे साम्राज्य आहे. काही कॉलन्यांमध्ये रस्ते पाईपलाईनसाठी खोदले आहेत. ते तसेच पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकी घसरून लोकांना दुखापत होत आहे. काही ठिकाणी रस्ते नाहीत. सव्वा कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असताना ग्रामपंचायतीने चांगल्या दर्जाचे रस्ते करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कॉलन्यांमध्ये गटारीची व्यवस्था नाही. यामुळे पाणी तुंबून रस्त्यावर दलदल निर्माण झालेली असल्यामुळे डासांचा उपद्रव होत असून अनेक रोगांना बळी पडत आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी जंतुनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे स्ट्रीट लाईट, ओपन स्पेस वर्ग, स्वच्छता या समस्यांचा गांभीर्याने विचार करून सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत. ८ दिवसांत या समस्यांवर उपाययोजना न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना उपतालुकाप्रमुख विवेक काटकर, विभागप्रमुख अभिजीत पोरे, विशाल घराळे, साहिल आत्तार, अविनाश माळी, अमित पाटील, हर्षल मावशीकर, आनंद लोकळूचे, स्वप्नील बारटक्के आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.