कोल्हापूर.एचआयव्हीसह जगतानाची जिद्द समाजाला प्रेरणादायक. उपजिल्हाधिकारी डॉ.खिलारी:
09260
एचआयव्हीसह जगतानाची जिद्द प्रेरणादायी
उपजिल्हाधिकारी डॉ. खिलारी; एड्स सप्ताहाची सांगता
कोल्हापूर, ता. ७ ः `‘कळायच्या आधीच आई-वडील गेल्याने आलेले अनाथपण, लग्नानंतर लगेचच लागण देऊन एचआयव्हीने मरण पावलेला पती त्यानंतर आलेले एकाकीपण, समाजाकडून होणारी अवहेलना. हे केवळ सहनच न करता जिद्दीने, न डगमगता कुणी शिक्षण पूर्ण करून आर्मीत प्रवेश मिळवला, कोणी नर्सिंग केले, कोणी शिक्षिका, डॉक्टर, व्यावसायिक बनले.तर एकीने नुकतेच टुरिझमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर एअरपोर्टवर नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. साहस आणि जिद्दीची अशी अनोखी संघर्षमय उदाहरणे खंबीरपणे समाजासमोर येऊन आदर्श ठरावीत;’’ असे उद्गार उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एनकेपी प्लस संस्थेमार्फत आयोजित विशेष कौतुक सोहळ्यात काढले.
एचआयव्हीसह जगत असलेल्या युवा मुलांना व विधवा महिलांना त्यांच्या साहसी कर्तृत्वासाठी कौतुकाची थाप देऊन बळ दिले. तसेच त्यांनी पुढे १५ एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांना पुढील वर्षभर पोषक आहार पुरवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
सीपीआर हॉस्पिटलच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता थोरात यांनी एचआयव्ही संसर्गितांसाठी सामाजिक योजना मिळवून देण्यासाठी विहान करत असलेल्या परिश्रमाची प्रशंसा केली. कार्यक्रमअधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या, ‘‘खरोखरच आज सत्कार झालेल्या व्यक्ती म्हणजे सकारात्मकतेचे जिवंत उदाहरण आहेत. ‘टेक द राइट्स पाथ’ यंदाच्या या थीमला अनुसरून एचआयव्हीसह जगणाऱ्या युवा व महिलांनी खचून न जाता खंबीरपणे हक्कांचा मार्ग स्वीकारून सुखी आयुष्य जगत आहेत.’ यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार तसेच एनकेपी प्लस संस्थेच्या अध्यक्ष वैशाली बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन संजय साऊळ यांनी केले. सुश्मिता भाकवे यांनी आभार मानले. यावेळी अमित सावंत, आशीष खरबडे, सुनीता पाटील यांच्यासह संस्थेचे समुपदेशक, क्षेत्रीय कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

