कंदलगाव .गजबजलेल्या हॉकी स्टेडियम चौकात रस्त्यावर''पार्किग''

कंदलगाव .गजबजलेल्या हॉकी स्टेडियम चौकात रस्त्यावर''पार्किग''
Published on

09564

हॉकी स्टेडियम चौकात
रस्त्यावरच पार्किंग

सिग्नल आहे, पोलिस नाही; वाहनधारकांची कसरत

सकाळ वृत्तसेवा

कंदलगाव, ता. ७ : रस्त्यावर दुकानचे फलक, अस्ताव्‍यस्त पार्किंग, वाहतूक कोंडी यामुळे हॉकी स्टेडियम चौक सध्या चर्चेत आहे. त्यामुळे चौकात सुरळीत वाहतूक व पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातून सकाळी व संध्याकाळी ऑफिस, शाळा सुटल्यावर हॉकी स्टेडियम चौकावर वाहतुकीचा भार पडत आहे. अशावेळी चौकात असणाऱ्या खाऊच्या गाडीवर नाष्टा व पार्सल घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. ग्राहक वाहने रस्त्यावर पार्किंग करत असल्याने या मार्गावर रस्ता शोधताना स्थानिकांसह प्रवाशांची कसरत होत आहे. चौकात सिग्नल आहे; मात्र वाहतूक पोलिस नसल्याने अनेकजण सिग्नल तोडून आडव्या तिडव्या मार्गाने सुसाट जातात. चौकातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करून वाहनधारकांची कसरत थांबवावी; अशी मागणी उपनगर कृती समितीतर्फे केली आहे.

फलक रस्त्यावर
परिसरात मोठ्या प्रमाणावर खाऊच्या गाड्या असल्याने व गाडीसमोरच पार्किंग होते. अनेकदा दुकानाचे फलक दिसत नाहीत म्हणून काही टपरीधारक रस्त्याला लागून दुकानाचे फलक लावतात. त्यामुळे पुन्हा पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या वाढली.
कोल्हापूर शहर व सायबर चौकातून कळंबा, पाचगाव, गारगोटीसह उपनगरातील कॉलन्यांत जाण्यासाठी एकमेव चौक असल्याने येथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. चौकात असणारा सिग्नल सुरळीतपणे चालतो; मात्र वाहतूक पोलिस नसल्याने हुल्लडबाज प्रवासी आरामात आडवे तिडवे निघून जातात. त्यामुळे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

बॅरिकेट्स व खड्डयांचा अडथळा.
जलवाहिनी गळती व इतर सुविधांच्या केबल टाकण्यासाठी चौकात खोदाई केलेली असते. खोदाईनंतर संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने खोदाईचे खड्डे मोठे होऊन चौकात खड्डयांचे साम्राज्य आहे. येथे एक-दोन बॅरिकेट्स लावलेले असतात. बॅरिकेट्स व खड्डयांमुळे अडथळा होत असतो.

कोट
09563
हॉकी स्टेडियम चौकातून घरी जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. चौकात बेशिस्त पार्किंग, वाहतुकीची कोंडी असल्याने वाहन चालविणे जीवावर येते. -
- पल्लवी मेढेकर, जरगनगर.
____ _ _

09562
पाचगाव, जरगनगर व कळंबा या उपनगरासह आसपासच्या उपनगरांत जाण्यासाठी हॉकी स्टेडियम एकच मार्ग आहे. त्यामुळे मार्गावर वाहतुकीचा ताण पडत आहे. त्यातच चौकातील खाऊच्या टपऱ्या आणि त्यांच्यासमोरचे पार्किंग धोकादायक ठरत आहे. संबंधित विभागाने व्यावसायिकांना सूचना देऊन पार्किंग रस्त्याच्या एका बाजूला करावे.
- बाळासाहेब देसाई, पाचगाव रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com