कोल्हापूर.''माझा भांडी प्रपंच''याने श्रोते गहिवले.

कोल्हापूर.''माझा भांडी प्रपंच''याने श्रोते गहिवले.
Published on

10259
कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरात शुक्रवारी ‘माझा भांडी प्रपंच’ या अभिवाचन करताना चित्कला कुलकर्णी व संतोष आबाळे.

‘माझा भांडी प्रपंच''ने गहिवरले रसिक
वासंती इनामदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवाचन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महिलांना गृहिणीच्या जबाबदारीबरोबरच अनेक नाती जपावी लागतात. नात्यांसह आलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्याच तोलामोलाने सांभाळाव्या लागतात. त्यांचा हा सारा प्रवास म्हणजे ‘माझा भांडी प्रपंच''. चित्कला कुलकर्णी आणि संतोष आबाळे हा प्रवास उलगडत होते आणि त्याबरोबरच रसिकही गहिवरून जात होते. निमित्त होते, ज्येष्ठ लेखिका वासंती इनामदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. करवीर नगर वाचन मंदिरात हा कार्यक्रम झाला.
पुढची पिढी घडविण्याची मुख्य जबाबदारी, कुटुंबाचे आर्थिक नियोजन, दररोजच्या वापरातील वस्तूंची उपलब्धता आणि त्यांच्याशी असणारे भावनिक नाते हे फक्त घरातील महिलांनाच माहीत. मुलांच्या शिक्षणाशी संबधित नियोजन, परिस्थितीनुसार स्वतःला बदलत त्यांची ही कसरत सुरू असते. या साऱ्या गोष्टींवर अभिवाचनातून भाष्य झाले. अधूनमधून सादर होणाऱ्या उखाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अश्विनी वळीवडेकर यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, कार्यवाह डॉ. आशुतोष देशपांडे, नितीन कुलकर्णी, निखिल शेंद्रे, संजीवनी तोफखाने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com