

गॅस टंचाईला सौरचुलीचे
उत्तर ः पराग केमकर
कंदलगाव : ‘‘आखाती युद्धामुळे भारतभर गॅस टंचाईला अभूतपूर्व तोंड द्यावे लागत आहे. त्यावर मात करायची असेल तर सौरचुलीचा वापर घरोघरी करावा लागेल. आणि हेच गॅस टंचाईला उत्तर असेल,’’ असे प्रतिपादन विज्ञानप्रेमी पराग केमकर यांनी केले. आर. के. नगर येथील आनंदी महिला जागृती संस्थेतर्फे आयोजित सौरचूल कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी केमकर यांनी सौरचुलीमध्ये भात, रवा भाजून दाखवला. आपल्या घरी जुना पुठ्ठा असेल तर केवळ पन्नास रुपयांमध्येही चूल घरच्या घरी तयार करता येते. याचे प्रात्यक्षिकही दाखवले. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी सौर चुलीसोबत बायोगॅस, निर्धूर चूल, स्वयंपाक करताना घ्यावयाची दक्षता यासंबंधी विवेचन केले. सौर चूल कार्यशाळेत मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे नियोजन अलका देवलापूरकर, राजश्री वडगावे, लतिका वाघमारे, मेघा शिंदे यांनी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.