कोल्हापूर .महिला निवारा ट्रस्टसाठी जागा द्या

कोल्हापूर .महिला निवारा ट्रस्टसाठी जागा द्या
Published on

12894

महिला निवारा ट्रस्टला जागेसाठी
रिपब्लिकन सेनेतर्फे निदर्शने

कोल्हापूर, ता. ८ : शेवंताबाई महिला निवारा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत २४ मार्च २०२२ पासून महिला निवाऱ्यासाठी जागा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.
ट्रस्टसाठी जागेबाबत जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा कार्यालय यासह एकूण आठ कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र आजअखेर चार वर्षे झाली तरी कामाची पूर्तता झालेली नाही. तसेच ट्रस्टला जागाही मिळालेली नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे बहुजन समाजातील कष्टकरी, कामकरी, गरीब असहाय्य महिलांना वंचित ठेवण्याचे काम होत आहे. आज केलेली मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र लढा उभारू; असा इशारा सेनेतर्फे दिला. रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र कांबळे, उपप्रमुख जितेंद्र कांबळे, सल्लागार रमेशभाई कामत, प्रहार पक्ष शहराध्यक्ष शैलेश कांबळे, रामेश्वरी पारखे, पूनम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com