

12900
आर. के. नगर नवीन
रस्त्याची दुरवस्था
डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी
कंदलगाव, ता. १२ : दोन महिन्यांपूर्वी लाखोंचा निधी खर्च करून आर. के. नाका ते खडीचा गणपती मंदिर या अर्धा किमी अंतरातील रस्त्याचे खडीकरण पूर्ण केले आहे. हे खडीकरण पूर्ण करून दोन महिने उलटले तरी रस्त्यावर डांबर टाकले नसल्याने हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे नागरिकांतून रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
काही दिवसांवर पावसाळा आला आहे. अशावेळी या रस्त्यावर अनेक समस्या उद्भवणार आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करावा. चार ते पाच वर्षांपासून रस्त्यावर अनेक खड्डयांची समस्या स्थानिक नागरिक व प्रवाशांना जाणवत होती. त्यामुळे हा रस्ता नवीन करण्याची मागणी केली होती. दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर खडी आणि कच्च्या प्रमाणात इतर साहित्य टाकून रस्ते केला आहे; मात्र डांबर पडले नसल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी आली आहे.
. . .
विभागांचे दुर्लक्ष .
ठेकेदारांचा संप आणि या संपामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर समस्या उद्भवत आहेत.
. . .
कोट
आर. के. नगर रस्त्यावर मोठ्या समस्या जाणवत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत आहे. संबंधित विभागांनी या रस्त्याचे काम पूर्ण करावे.
- सुधाकर माने, ज्येष्ठ नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.