खोचीत विद्यार्थ्यांनी भरवला बाजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोचीत विद्यार्थ्यांनी भरवला बाजार
खोचीत विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

खोचीत विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

sakal_logo
By

खोचीत विद्यार्थ्यांनी भरवला बाजार
खोची, ता. १७ : येथील विद्यामंदिर शाळेतर्फे आठवडा बाजार भरवला. उद्‍घाटन शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय चव्हाण यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदय पाटील, विरोचन शिंदे, विशाल पाटील, शीतल गुरव, योगिता इंगळे, वर्षा मुसळे, मुख्याध्यापक वाय. सी. घाटगे उपस्थित होते.
प्राथमिक विद्यामंदिरतर्फे आठवडा बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन आर्थिक व्यवहाराचे संस्कार शिकवण्यासाठी, तसेच बाजारात आपले उत्पादन बाजारात विकण्याची कला अवगत करता यावी. या उद्देशाने या आठवडा बाजाराचे आयोजन केले होते. आठवडा बाजारात विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात पिकलेल्या पालेभाज्या, फळभाज्या, तसेच विविध वस्तूंचा व्यापार केला. काही विद्यार्थ्यांनी खाऊगल्ली उभारून विविध पदार्थांची चव पालकांना चाखावयास दिली. आठवडा बाजाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुभाष गुरव, भीमराव भानुसे, आनंदा कुंभार, उत्तम पोळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.