
बलिदान मासाची खोचीत सांगता
खोचीत मूक पदयात्रा
खोची ः भगवा ध्वज आणि धगधगती मशाल घेऊन मूक पदयात्रेने धर्मवीर बलिदान मासाची येथे सांगता करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त धर्म रक्षण शौर्याला अभिवादन करण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रणमर्द शिलेदार आखाडा व अरुणोदय मर्दानी खेळ आखाडा यांच्यावतीने बलिदान मासाचे आयोजन केले होते. पदयात्रेत शिवभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास आयोजित केला होता. हनुमान मंदिर चौकात ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्राने मूक पदयात्रेस प्रारंभ करून गावातील प्रमुख मार्गावरून मूक पदयात्रा काढण्यात आली. पुन्हा हनुमान मंदिराजवळ पदयात्रेची सांगता करण्यात आली. बलिदान मास उपक्रमात मोठ्या संख्येने युवावर्ग सामील झाला होता.