भेंडवडे मारहाण प्रकरणी एकूण चार फिर्यादी दाखल -एकास पोलिस कोठडी,एक जण ताब्यात

भेंडवडे मारहाण प्रकरणी एकूण चार फिर्यादी दाखल -एकास पोलिस कोठडी,एक जण ताब्यात

भेंडवडे हाणामारीप्रकरणी
एकास कोठडी, एक जण ताब्यात
खोची, ता.६ः भेंडवडे येथे काल झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून पेठवडगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी एकूण चार फिर्यादी दाखल झाल्या आहेत. आजही गावात तणावपूर्ण वातावरण होते. पेठवडगाव पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, आज प्रतीक पसाले याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. तर गोरखनाथ कांबळे याला सायंकाळी ताब्यात घेतले आहे.
माने गटाच्या दशरथ आनंदराव देसाई यांच्या फिर्यादीवरून, निकम गटाच्या ३१ जणांवर जमाव जमवून तलवारी, लोखंडी रॉड, गज व काठ्यांचा वापर करून मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. दुसऱ्या फिर्यादीत शुक्रवारी रात्री उशिरा निकम गटाच्यावतीने बालाजी निकम यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून माने गटाच्या सात ते आठ जणांनी तलवारी, लोखंडी गज यांच्या सहाय्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. तसेच एक दुचाकी गाडी जाळल्याची फिर्याद दिली आहे. निकम यांच्या फिर्यादीत माने गटाच्या दहा जणांसह १५ ते २० अज्ञातांवर गुन्हा नोंद झाला आहे. तसेच तिसऱ्या फिर्यादीत एका महिलेने माने गटाच्या सात ते आठ जणांनी गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास घरात घुसून पतीस शिवीगाळ केल्याची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com