खोची परिसरात सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना अभिवादन,सद्भभावना दौड चे आयोजन

खोची परिसरात सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना अभिवादन,सद्भभावना दौड चे आयोजन

Published on

03176
खोची, भेंडवडे परिसरात
तात्यासाहेब कोरे यांना अभिवादन
खोची, ता. १३ ः खोची, भेंडवडे परिसरात सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील कै. ए. बी. पाटील सहकार समूहाच्यावतीने तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
भैरवनाथ दूध संस्थेच्या प्रांगणात खोची विकास सेवा संस्थेचे संचालक पांडुरंग पाटील व विरोचन शिंदे यांच्या हस्ते स्मृतिज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी उपसरपंच सुहास गुरव, भैरवनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष जालिंदर पाटील, खोची विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष सयाजी पाटील, संचालक शरद पाटील, संदीप पाटील, सचिव तानाजी पाटील, संभाजी पाटील, उदय पाटील, सागर शिंदे,शिवाजी सूर्यवंशी,शिवाजी पाटील,सागर थोरवत, यशवंत कोळी, सतीश पाटील, प्रतीक पाटील, आयुष मगदूम, प्रकाश चव्हाण, अनिल जाधव, जयसिंग बामणे, संजय मगदूम उपस्थित होते.
तसेच स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या पुण्यस्मरणानिमित्त खोची ते वारणानगर सदभावना दौड काढली. यावेळी ‘तात्यासाहेब कोरे अमर रहे...’ असा जयघोष करण्यात आला. स्मृती ज्योतीचे वारणानगर येथे वारणा समूहातील मान्यवरांनी स्वागत केले. सद्भावना दौडीमध्ये सहकार समूहातील पदाधिकारी; कर्मचारी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com