संभाजीनगर बस स्थानकाचे हस्तांतरिकरण रखडले

संभाजीनगर बस स्थानकाचे हस्तांतरिकरण रखडले

88186
कळंबा : दहा कोटींच्या निधीतून संभाजीनगर बस स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे.

संभाजीनगर बसस्थानकाचे हस्तांतरण रखडले
भोगवटा प्रमाणपत्राची प्रतीक्षा; सुसज्ज इमारत वापराविना पडून
संजय दाभाडे : सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता. ४ : इमारत बांधून चार महिने पूर्ण झाले तरी संभाजीनगर बसस्थानकाचे हस्तांतरण रखडले आहे. महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळे हे बसस्थानक धूळ खात पडले आहे. एसटी महामंडळाचे आर्थिक चक्र गतिमान करण्यासाठी हे बसस्थानक लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहेत.
मध्यवर्ती व रंकाळा बसस्थानक येथील एसटी बस व अन्य प्रवासी वाहनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या पार्श्‍वभूमीवर संभाजीनगर आगाराच्या विस्तारासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून शासनाने डिसेंबर २०२० मध्ये दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीमधून तीन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये संभाजीनगर बसस्थानकाचे १८०० चौरस मीटरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. गेली दोन वर्षे या बसस्थानकाचे काम सुरू होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, सुसज्ज व अत्यंत देखणी इमारत उभी राहिली आहे.
बसस्थानकाची‍या हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने महापालिका बांधकाम विभागाकडे भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कागदपत्रे दाखल केली आहेत. मात्र, याबाबत महापालिकेने कोणतीही कार्यवाही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे हे बसस्थानक वापराविना पडून राहिले आहे. दरम्यान, पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बसस्थानकाअभावी प्रवाशांना भिजतच एसटी बसची वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बसस्थानकाचे हस्तांतरण तत्काळ होण्याची गरज आहे.
----------------
चौकट
नऊ प्लॅटफॉर्मसह विविध सुविधा
संभाजीनगर बसस्थानकात एसटीचे नऊ प्लॅटफॉर्म आहेत. तसेच तिकीट आरक्षण गृह, हिरकणी कक्ष, महिला पुरुष चालक/वाहकांसाठी विश्रांतीगृह, प्रसाधनगृह, जेनेरिक औषधांचे दुकान, शॉपिंग सेंटर, पार्किंग व्यवस्था, पार्सल सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधांनी उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर-गारगोटी व कोल्हापूर-राधानगरी या मार्गांवरील दोनशेंहून अधिक गावांतील प्रवाशांना येथून बस सेवा मिळणार आहे.
-----------------
कोट
कोल्हापूर विभागातील संभाजीनगर बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच एसटी व अन्य प्रवासी वाहनांमुळे शहरातील निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. काही तांत्रिक बाबींमुळे बसस्थानकाच्या हस्तांतरण प्रक्रियेचे काम रखडले आहे.
- संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी
------------------
कोट
संभाजीनगर बसस्थानकाच्या भोगवटा प्रमाणपत्राविषयी महापालिका प्रशासनाशी दोन दिवसांत चर्चा करणार असून, प्रवाशांच्या सेवेत लवकरच बस स्थानक कार्यरत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सतेज पाटील, आमदार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com