

02156
कळंबा तलाव पात्राला मैदानाचे स्वरूप
पाणी पातळी तीन फुटांवर; फुटबॉलसह खेळण्यासाठी बालचमूंची गर्दी
कळंबा ता. २ : मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र कळंबा तलावाचे पात्र अद्याप कोरडेच पडल्याचे चित्र दिसत असून पाणी पातळी तीन फुटांवर पोचली आहे. दरम्यान तलावाच्या कोरड्या पडलेल्या पात्रामध्ये शाळकरी मुले क्रिकेट व फुटबॉल खेळताना दिसत आहे. महिन्याभरापूर्वी पात्रात कुस्तीचे जंगी मैदान आयोजित केले होते. त्यामुळे पात्राला खेळाच्या मैदानाचे स्वरूप आल्याचे दिसत आहे.
कळंबा पाझर तलाव असल्यामुळे मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन तलावाचे पात्र भिजून चिंब झाल्यानंतर व पात्रामधून पाणी पाझरू लागल्यानंतर तलावाच्या भरतीला सुरुवात होते. मात्र तलावाच्या पाणलोट क्षेत्रात आठ ते दहा दिवस धुंवाधार पर्जन्यवृष्टी होण्याची गरज आहे. प्रत्येक पावसाळ्यातील हे चित्र आहे. दरम्यान जून संपला असून अनियमित पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत किंचितही वाढ झालेली नाही. त्यामुळे तलावाचे तिन्ही बाजूंचे पात्र कोरडे पडले आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील काळामध्ये दमदार पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तलाव भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पाणीसाठ्याअभावी तलावाचे पात्र कोरडे पडल्यामुळे तलावला मैदानाचे स्वरूप आले आहे. येथे कुस्तीचा फड, फुटबॉल व क्रिकेटचे सामने आयोजित केले जात आहेत. अनेक शाळकरी मुले शनिवार, रविवार व इतर दिवशी खेळ खेळताना दिसत आहेत.
चौकट..
मनपाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका
शहरासह उपनगराला दीपावलीपासून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी योजनेतूनही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू होता. महापालिका प्रशासनाने कळंबा तलावातून दैनंदिन आठ एमएलडी पाणी उपसा सुरू ठेवला होता. त्यामुळे तलावाच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होऊन तलाव कोरडा पडला आहे. महापालिकाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका तलावाला बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.