

02586
झाड उन्मळून पडल्याने
कळंब्यात वाहतुकीला अडथळा
सकाळ वृत्तसेवा
कळंबा, ता. २४ : कळंबा पश्चिम भाग परिसरातील बापूरामनगर येथे मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. उपनगरातील अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने येथील परिसराची पाहणी करून उन्मळून पडलेले झाड व फांद्या बाजूला करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व वादळ वाऱ्यामुळे बापूराम नगर मधील मुख्य रस्त्यालगत असलेले मोठे झाड उन्मळून पडले आहे. या झाडाच्या फांद्या रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ५० पेक्षा जास्त कॉलनी व नगरांना जाण्यासाठी बापूरामनगर हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.