जोतिबा मंदीरात भाविकाचे पैसे चोरणाऱ्या महिलेला अटक : सिसीटीव्हीमुळे सापडली महिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोतिबा मंदीरात भाविकाचे पैसे चोरणाऱ्या महिलेला अटक : सिसीटीव्हीमुळे सापडली महिला
जोतिबा मंदीरात भाविकाचे पैसे चोरणाऱ्या महिलेला अटक : सिसीटीव्हीमुळे सापडली महिला

जोतिबा मंदीरात भाविकाचे पैसे चोरणाऱ्या महिलेला अटक : सिसीटीव्हीमुळे सापडली महिला

sakal_logo
By

जोतिबा खेट्यावेळी रोकड
चोरणाऱ्या महिलेस अटक
कोडोली, ता. २७ : जोतिबा खेटेवारी दरम्यान रविवारी (ता. २६) जोतिबा मंदिराबाहेरील गाभाऱ्यात ‘श्रीं’च्या दर्शन रांगेत असणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या खिशात हात घालून पैसे चोरणाऱ्या भारती मदन महाजन (वय ५२ रा. गडमुडशिंगी) या महिलेस कोडोली पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजीतील भाविक तुकाराम मलकाजी जवळगी दुपारी ३ वा. देवदर्शनासाठी आले असता गाभाऱ्यातील दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेवून भारतीने त्यांच्या खिशातील १२ हजार रोकड चोरली. कोडोली पोलीसांना चॉकलेटी स्कार्फ व हिरवी साडी घातलेली महिला एवढेच वर्णनाची माहिती फिर्यादी व इतर भाविकांकडून मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरवात करून देवस्थान समितीचे मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज देवस्थानचे तंत्रज्ञ राहुल जगताप यांच्या तांत्रिक तपासाच्या साहाय्याने तपास करून हा गुन्हा लगेच उघडकीस आणला. महिलेचा शोध घेवून तिला ताब्यात घेवून तिच्याकडून चोरीची रक्कम जप्त केली आहे. पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पोलीस हावलदार मधुकर परीट तपास करित आहेत.