
कोडोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मोहोत्सव साजरा करण्यात येणार
कोडोलीत महिलादिनी कार्यक्रम
कोडोली ता. २ : येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार (ता. ५) व बुधवारी (ता. ८) महिला महोत्सव होणार आहे. यानिमित्त महिलांसाठी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी फौंडेशनमार्फत होणार असल्याची माहिती अध्यक्षा विनिता पाटील यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘येथील अंबाबाई मंदिराच्या सभागृहात ग्रामीण महिलांसाठी काचाकवड्या, दोरी उड्या, बिट्ट्याचा खेळ, रस्सीखेच, कांदा फोडी, पत्त्याचा बंगला, लिंबू चमचा, आईचं पत्र हरवले, काचे कोडे, फुगडी, घोडा असे मनोरंजक खेळ घेण्यात येतील. वेशभूषा, रॅम्प वॉक अशा स्पर्धेतून मिस यशस्वी २०२३ व मिसेस यशस्वी २०२३ विजेते निवडण्यात येतील. पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव होईल. उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन विनिता पाटील यांनी केले. यावेळी मंदार पसरणीकर, फौंडेशनच्या उपाध्यक्ष वैशाली पोवार, भारती साळोखे, स्वाती बावणे, ग्रेस गायकवाड, सरिता पाटील, सुप्रिया केकरे, विद्या समुद्रे, मुस्कान नदाफ, विजय कोपार्डे, किरण जाधव उपस्थित होत्या.