गो वंशीय बैलाची कत्तल केलेने कोडोली पोलिस ठाण्यात पतिपत्नी विरोधात गुन्हा दाखल

गो वंशीय बैलाची कत्तल केलेने कोडोली पोलिस ठाण्यात पतिपत्नी विरोधात गुन्हा दाखल

Published on

बैलाची कत्तल; पती-पत्नीविरोधात गुन्हा
कोडोली : बैलाची कत्तल केल्याचे उघडकीस आल्याने पती-पत्नी विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय महापुरे व पूनम विजय महापुरे (रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री बैलाची कत्तल करून त्याचे मांस विक्री करीत असल्याची माहिती समजताच बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र जमले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी पोलिस फौज फाट्यासह तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कत्तल केलेला बैल व वापरण्यात आलेले इतर साहित्य ताब्यात घेतले. शाहूवाडी विभागाचे उपविभागीय अधिकारी जयकुमार सूर्यवंशी, नायब तहसीलदार जमादार यांनी परिस्थितीची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत ते थांबून होते. येथील शासनाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात कत्तल केलेल्या बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.