कोडोलीत मुलींना स्वःसंरक्षणाविषयी मार्गदर्शन

कोडोलीत मुलींना स्वःसंरक्षणाविषयी मार्गदर्शन
Published on

कोडोलीत मुलींना स्वःसंरक्षणाविषयी मार्गदर्शन
कोडोली ता. २७ : येथील कन्या विद्यामंदिर शाळेत कोडोली पोलिस ठाण्यातर्फे मुला-मुलींना स्वः संरक्षणाविषयी तसेच स्पर्शा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग होते. यावेळी कोडग म्हणाले, ‘‘मुलींनी आहारात बेकरी पदार्थ ऐवजी पालेभाज्या फळे कडधान्य आशा सकस आहाराचा समावेश करावा. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक कार्यरत असुन महिला, मुलींना अडचण आल्यास ११२ या क्रमांकावर संपर्क करावा.’’ यावेळी सुरक्षेविषयी काही व्हिडीओ दाखवण्यात आले. रविकांत यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नेरकर, संदिप रोकडे, शुभांगी वळीव, अर्चना रोकडे, शुभांगी मानकर, कोमल पाटील उपस्थित होते. बाबासाहेब पाटील यांनी सुत्रसंचालन केले. हरी पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com