वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषध निर्माता दिवस साजरा

वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये जागतिक औषध निर्माता दिवस साजरा
Published on

03444
‘वासंतीदेवी पाटील’मध्ये
फार्मासिस्ट दिनी शिबिर

कोडोली, ता. ३० : येथील वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जागतिक औषध निर्माता दिन झाला. यानिमित्त जाखले पोखलेतील सत्तरहून अधिक ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी झाली.
१९१२ मध्ये इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त २५ सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिन होतो. यावेळी महाविद्यालयांमध्ये मादक पदार्थांचा गैरवापर विषयावर डॉ. प्रिया पाटील यांचे व्याख्यान झाले. त्यांनी मादक पदार्थाचा शरीराला असलेला धोका सांगितला. यावेळी महाविद्यालयाने जाखले, पोखलेत विविध आरोग्य तपासणी व पेशंट कौन्सिलिंग उपक्रम राबविला. केखले जिल्हा परिषद शाळेक विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासणी, पौष्टिक आहाराबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासला. साखर, व रक्तदाब तपासणी झाली. यामध्ये रक्तात वाढलेली साखर व वाढलेला रक्तदाब कसा नियंत्रित करावयाचा व होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दलचे मार्गदर्शन केले. उपक्रमासाठी डी. फार्म, बी. फार्म आणि डी.फार्म मधील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उपक्रमासाठी सचिव डॉ. जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांचे सहकार्य तर प्राचार्य डॉ. ए. एस. मंजाप्पा यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक वैशाली पोवार, प्रा. उमेश पाटील, प्रा. कविता माने, प्रा. गौरव केकरे व प्रा. वैभव पाटील, प्रा. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com