कोडोलीत महाकुंकूमार्चन सोहळा ‘सकाळ-तनिष्का’, निर्माण सामाजिक संस्थेतर्फे आयोजन
03457
कोडोलीत महाकुंकुमार्चन सोहळा
कोडोली ता. ४ : येथे तनिष्का गट व निर्माण सामाजिक बहुउदेशी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रीचे औचित्य साधून प्रथमच महाकुंकूमार्चन सोहळा झाला. सोहळ्यात दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
येथे अंबाबाई मंदिरात ग्रामदैवत देवी अंबाबाई मूर्तीचे पूजन करून सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी पुजारी प्रवीण बुरांडे यांनी, सौभाग्यप्राप्ती, सौभाग्यवृद्धी, सौभाग्य वर्धनासाठी कुंकूमार्चन सोहळ्याचे महत्त्व सांगितले. यावेळी निर्माण सामाजिक संस्थाध्यक्ष जयदीप पाटील म्हणाले, ‘समाजातील माता-भगिनींचा आदर करावा.’ तनिष्का गटप्रमुख रूपाली पाटील म्हणाल्या, ‘तनिष्का गटामुळे महिलांना खंबीरपणे पाठबळ मिळत असून सामाजिक, आध्यात्मिक उपक्रमांत सहभाग घ्यावा.’ समन्वयक सुशांत पाटोळे यांनी तनिष्काच्या उपक्रमांची माहिती देत महिलांना सहभागाचे आवाहन केले. यावेळी नऊ महिलांच्या हस्ते आरती, प्रसाद वाटप झाले. यावेळी तीन लकी ड्रॉ काढून महिलांना पैठणी देण्यात आली. यावेळी सरपंच स्वाती हराळे, यशवंत शिक्षण समूहाच्या विश्वस्त विनिता पाटील, तेजल जाधव बहिरेवाडी, प्रांजल पाटील, उज्वला जाधव बहिरेवाडी, शोभा पाटील, निर्मला पाटील, शोभा वाडकर व तनिष्का सदस्या सीमा पाटील, पूनम जाधव, वर्षा मगदूम, संगीता सतीश पाटील उपस्थित होते. गटप्रमुख रूपाली पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

