राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत यशवंत हायस्कूलचे यश

राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत यशवंत हायस्कूलचे यश

Published on

3519
कोडोली ः शालेय शासकीय १७ वर्षांखालील राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंसोबत डॉ. जयंत पाटील, पंडित साळोखे, डॉ. मयूर साळोखे, लाला पाटील, सोनाली जाधव आदी.
...............
राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत
यशवंत हायस्कूलचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोडोली, ता. १९ : शालेय शासकीय १७ वर्षांखालील राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या यशवंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कोडोली (ता. पन्हाळा) मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात मुंबई संघाचा १३ विरुद्ध ३ गोलने पराभव करून महाराष्ट्र स्तरावर सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले.
स्पर्धा चाळीसगाव (जि. जळगाव) येथे पार पडल्या. तेथे कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व यशवंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी करत राज्यस्तरावर सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावले. संघाला प्रकाश राठोड, डॉ. मयूर साळोखे, सोयब फकीर, संघ व्यवस्थापिका सोनाली जाधव यांचे मार्गदर्शन, तर संस्थेच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, सचिव डॉ. जयंत पाटील, विश्वस्त विनिता पाटील, मानद सचिव व्ही. डी. पाटील, प्राचार्य पंडित साळोखे यांचे प्रोत्साहन, तर माजी खेळाडू, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com