कोडोलीच्या सरपंचपदी शिल्पा झेंडे - बिनविरोध निवड
03554
कोडोली सरपंचपदी
शिल्पा झेंडे बिनविरोध
कोडोली : कोडोली (ता.पन्हाळा) येथील सरपंचपदी शिल्पा सुरेश झेंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोडोलीचे मंडल अधिकारी अरुण माळगे यांनी जाहीर केले. २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार विनय कोरे, गोकुळ संचालक अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील या गटांनी एकत्रित निवडणूक लढवत सत्ता स्थापन केली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्याने सर्व विजयी महिला सदस्यांना सरपंचपदाची संधी देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे सरपंचपदाचा स्वाती प्रकाश हराळे यांनी राजीनामा दिल्याने कोडोलीचे सरपंचपद रिक्त झाले होते. या जागेसाठी आज झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्या शिल्पा झेंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने शिल्पा झेंडे यांची सरपंचपदी निवड झाली. यावेळी तलाठी अमर सांगरुळकर, ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण-पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. नूतन सरपंचांचा सत्कार गोकुळ संचालक अमरसिह पाटील यांनी केला. यावेळी कोडोली अर्बन बँक अध्यक्ष राहुल पाटील, प्रमोद कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे पक्षप्रवक्ते राजेंद्र पाटील, अरुण बजागे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हॊते. समर्थकांनी निवडीनंतर गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

