मिणचेत दिव्यांग साधनसामुग्री दुरूस्ती शिबीर संपन्न. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिणचेत दिव्यांग साधनसामुग्री दुरूस्ती शिबीर संपन्न.
मिणचेत दिव्यांग साधनसामुग्री दुरूस्ती शिबीर संपन्न.

मिणचेत दिव्यांग साधनसामुग्री दुरूस्ती शिबीर संपन्न.

sakal_logo
By

मिणचे खुर्दला साधनसामुग्री दुरुस्ती शिबिर
कोनवडे : प्राथमिक आरोग्य केंद्र मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग साधनसामुग्री दुरुस्ती शिबिर झाले. या शिबिरास गटविकास अधिकारी एस. एम. गावडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन, पं. स. भुदरगड, हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेकडील स्टाफ, सरपंच सौ. जयश्री खेगडे व उपसरपंच मनीषा नलवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळुंखे, दिव्यांग लाभार्थी व पालक उपस्थित होते. शिबिरात २१७ दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करून ज्यांची उपकरणे नादुरुस्त होती अशी उपकरणे दुरुस्त केली.