कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये सेट-नेट कार्यशाळा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये सेट-नेट कार्यशाळा.
कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये सेट-नेट कार्यशाळा.

कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये सेट-नेट कार्यशाळा.

sakal_logo
By

04193
हिरे महाविद्यालयात सेट-नेट कार्यशाळा
गारगोटी : येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातील बी.ए.बी.एड. एकात्मिक विभागाच्या १९९५/९६ च्या बॅचतर्फे महाविद्यालयासाठी योगदान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने सेट-नेट मार्गदर्शन कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन मौनी विद्यापीठचे संचालक प्राचार्य डॉ. पी. बी .पाटील यांच्याहस्ते झाले. कार्यशाळेत डाॅ. कृष्णात पाटील (शिवाजी विद्यापीठ), प्रा. राजेंद्र सावेकर (डाॅ. घाळी काॅलेज, गडहिंग्लज) व डाॅ. जयसिंग कांबळे (कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी) यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. चरण कांबळे यांनी प्रास्ताविक केले. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपप्राचार्य डाॅ. संजय देसाई, डाॅ. युवराज दीक्षित, प्रा. सुरेश राजरत्न, प्रा. राहुल चित्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र मेढेकर तर रंजना सुतार यांनी आभार मानले.