
बैल पळवण्याच्या स्पर्धेत प्रशांत तिळवे यांचा बैल प्रथम
B04221
कूर (ता. भुदरगड) : येथील बैल पळवण्याच्या स्पर्धेतील एक क्षण. (अरविंद सुतार : सकाळ छायाचित्रसेवा)
बैल पळवण्याच्या स्पर्धेत
तिळवे यांचा बैल प्रथम
कोनवडे, ता. १३ : कूर (ता. भुदरगड) येथील अध्यक्ष तरुण मंडळातर्फे भैरवनाथ यात्रेनिमित्त घेतलेल्या खुला बैल पळवण्याच्या स्पर्धेत सुशांत प्रशांत तिळवे (गारगोटी) यांच्या बैलाने प्रथम, तर हणमंत गौड (गोकाक-कर्नाटक) यांच्या बैलाने द्वितीय क्रमांक मिळविला. साहिल माने (अत्याळ) यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळवला.
विजयी स्पर्धकांना विक्रमसिंह आबिटकर, माजी उपसभापती अजित देसाई, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख संग्राम सावंत, मदन देसाई आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम व ढाल देऊन गौरवण्यात आले. अन्य विजयी असे- वाघाची तालीम (चौथा- वाघापूर), सुशांत मिसाळ (पाचवा-कूर). यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव देसाई, शाखा अभियंता डी. व्ही. कुंभार, शिवराम डवरी, विलास राजीगरे, बाजीराव राजीगरे, नेताजी सारंग, विकास देसाई, राहुल शिंदे, दिलीप सुतार, नीलेश डवरी, पी. एस. कांबळे उपस्थित होते.