सदुआबा सेवाभावी संस्थेतर्फे दत्तक विद्यार्थी साहित्य वाटप व नवीन शिक्षक सत्कार.

सदुआबा सेवाभावी संस्थेतर्फे दत्तक विद्यार्थी साहित्य वाटप व नवीन शिक्षक सत्कार.

Published on

04578
कोनवडेत शैक्षणिक साहित्य वाटप
कोनवडे : सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कोनवडे (ता. भुदरगड) येथील सदुआबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे होतकरू, गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप झाले. तसेच नव्याने बदली होऊन आलेले शिक्षकांचेही स्वागत झाले. अध्यक्षस्थानी एस. पी. पाटील होते. माजी उपसरपंच संजय पाटील म्हणाले, ‘अखेरच्या क्षणापर्यंत सदू आबांनी गोरगरिबांशी घट्ट नाळ ठेवली.’ संस्थाध्यक्ष आर. एस. पाटील, उपसरपंच विक्रम पाटील, सदस्य सुभाष पाटील, आबाजी कांबळे, शाळा समिती अध्यक्ष अनिल खतकर, मुख्याध्यापक मंगल टिक्के, प्रकाश पाटील, साताप्पा बुडके, दयानंद सुतार, वैष्णवी सुतार, चंद्रकांत पाटील, संभाजी बुडके, विठ्ठल पाटील, पुष्पलता पाटील, शुभांगी पाटील, भारती कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप पाटील, आभार आर. एस. पाटील यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.