टिक्केवाडीत ''माझी वसुंधरा'' अंतर्गत वृक्षारोपन.

टिक्केवाडीत ''माझी वसुंधरा'' अंतर्गत वृक्षारोपन.

Published on

04628
टिक्केवाडीत ५०० रोपांची लागवड
कोनवडे : टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथे ग्रामपंचायत व टिक्केवाडी हायस्कूलतर्फे शासनाच्या ‘माझी वसुंधरा’अभियानअंतर्गत ५०० रोपांची लागवड झाली. यावेळी सरपंच राजेंद्र पाटील म्हणाले, बदलते वातावरण आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. हा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखायचा असेल तर वृक्षारोपण काळाची गरज आहे.’ यावेळी टिक्केवाडी हायस्कूच्या विद्यार्थ्यांनी खड्डे खणून करंज, जांभूळ, वड, पिंपळ, फणस, आंबा अशा विविध जातीच्या रोपांची लागवड केली. यावेळी सरपंच राजेंद्र पाटील, उपसरपंच वैशाली गायकवाड, सदस्य शिवाजी रामाणे, आनंदा मिटके, आप्पासो देसाई, माधुरी देसाई, ग्रामसेवक नवनाथ आदमापुरे, पोलिसपाटील नेताजी गुरव, संतोष कांबळे, मुख्याध्यापक अमर देसाई, दत्तात्रय गुरव, सुभाष पाटील, एन. एन. नेवगे, साताप्पा कांबळे, नामदेव पाटील, प्रदीप पाटील, शिवाजी पाटील, सागर कांबळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.