नवीन भरतीमुळे जुन्या शिक्षकांची गोची

नवीन भरतीमुळे जुन्या शिक्षकांची गोची

संग्रहित शिक्षक छायाचित्र वापरावे.
...........
नवीन भरतीमुळे जुन्या शिक्षकांची गोची

स्वजिल्ह्यात येणारे हजारो शिक्षक कार्यमुक्तीच्या प्रतीक्षेत

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. १० : राज्य सरकारने नुकतीच पवित्र प्रणालीमधून नवीन शिक्षकांची नेमणूक केली आहे. या शिक्षकांचे समायोजन काही जिल्ह्यांत सुरू होत आहे. एकीकडे आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात येणारे हजारो शिक्षक गेले दोन महिने कार्यमुक्तीची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे काही शिक्षक अद्याप दुर्गम भागात असल्याने जिल्हांतर्गत बदलीसाठीचीही मागणी करत आहेत.
नवीन हजर होणाऱ्या शिक्षकांचे समायोजन केले तर ते मोक्याच्या सुगम जागा घेतील व आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात येणारे शिक्षक स्वजिल्ह्यात येऊनही दुर्गम भागात जातील, बदली होऊनही गैरसोय होईल ही भीती व्यक्त होत आहे. अगदी असेच जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांची नवीन शिक्षकांना नियुक्ती दिल्यास गैरसोय होणार आहे. यामुळे सर्वच शिक्षक संघटनांनी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना अगोदर कार्यमुक्त करावे, त्यानंतर जिल्हाअंतर्गत बदली व शेवटी नवीन शिक्षकांचे समायोजन करुन शाळा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. खरंतर हीच मागणी योग्य असल्याचे सर्व अनेकांचे मत आहे.
विशेष बाब म्हणजे शिक्षक संघटनेचे बडे नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या विषयासंदर्भात अनेकदा सरकारला अर्ज, विनंती व प्रत्यक्ष संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊनही सरकार अद्याप दाद देत नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांची सरकारबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
...
चौकट...
आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करा
आमची जिल्हा बदली होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. नवनियुक्त शिक्षकांचे समायोजन होऊन जर त्यांना शाळा दिल्या तर गेली वीस ते पंचवीस वर्षे जिल्ह्याबाहेर राहून स्वजिल्ह्यात येऊनही गैरसोयच होईल. यामुळे शासनाने लवकरच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी आंतरजिल्हा बदली झालेल्या शेकडो शिक्षकांतून मागणी होत आहे.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com