पृथ्वीराज पाटील ‘निळपण केसरी’

पृथ्वीराज पाटील ‘निळपण केसरी’

05343
निळपण (ता. भुदरगड) : येथे झालेल्या कुस्ती मैदानात पृथ्वीराज पाटील ‘निळपण केसरी’चा मानकरी ठरला. त्याला मानाची गदा देताना मान्यवर. (छाया : संजय ढेरे, निळपण)
................
पृथ्वीराज पाटील ‘निळपण केसरी’
सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. १० : निळपण (ता. भुदरगड) येथे महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी (ता. ९) झालेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने हरियाणा केसरी सोनू ग्रेवालवर मच्छी गोता डावावर मात करत ‘निळपण केसरी’चा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटीलला रोख दीड लाख, मानाची गदा बक्षीस देण्यात आली. रात्री उशिरा कुस्त्या झाल्या. यात्रा समितीच्या वतीने येथे मोठे मैदान भरवले होते.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मोतीबागचा अरुण बोंगार्डे व शाहू आखाड्याचा उमेश चव्हाण यांच्यात झाली. यात उमेशने विजय मिळविला. विजयी मल्लांना रोख रक्कम देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविले. येथील जय हनुमान कुस्ती संकुलाच्या अनेक मल्लांनी यश मिळवले. मान्यवरांचे हस्ते आखाडा पूजन झाले. तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती. निळपणला कुस्तीची परंपरा आहे. दरवर्षी येथे मोठे मैदान भरविले जाते. यंदा विविध गटांत व खुल्या अशा मातीतील कुस्त्या झाल्या. यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष मोहन मेंगाणे, देवस्थान समितीचे अध्यक्ष मारुती देसाई व तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावून कुस्तीचा आनंद घेतला.
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com