कालव्यातून हजारो लिटर पाणी वाया

कालव्यातून हजारो लिटर पाणी वाया

05501, 05500
दारवाड (ता. भुदरगड) ः येथे दरदेवी मंदिराशेजारी कालवा ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जात आहे. दुसऱ्या छायाचित्रात म्हसोबा पाणंदीतून वाहणारे पाणी. (अरविंद सुतार : सकाळ छायाचित्रसेवा)
.......
कालव्यातून हजारो लिटर पाणी वाया

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : दारवाड येथे दारदेवी मंदिराशेजारी ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २५ : दारवाड (ता. भुदरगड) येथे दारदेवी मंदिराशेजारी बसरेवाडी शिवारादरम्यान दूधगंगा उजवा कालव्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने अवर्तनावेळी कालवा सतत ओव्हरफ्लो होत असल्याने हजारो लिटर पाणी पाट, पाणंदीतून वाया जात आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त पाटबंधारे विभाग करणार का? अशी विचारणा परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
कूर उजवा कालवा मुदाळ येथून मिणेचे खुर्दकडे जातो. मुदाळपासून मिणचे खुर्दपर्यंतचे अंतर नऊ किलोमीटर आहे. सध्या पाण्याचे आवर्तन सुरू असून, कालवा काठोकाठ भरून वाहत आहे. सखल भागात असणाऱ्या कालव्याच्या ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. भुदरगड तालुक्यातील दारवाड येथील दारदेवी मंदिराशेजारी पाणी जास्त सोडल्याने हजारो लिटर पाणी पाट, पाणंदीतून वाहून वाया जात आहे.
एकीकडे दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करून तहान भागवावी लागत आहे, तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्याचा अपव्यय सुरू आहे. कालव्यावर बसविलेल्या अनेक सायफन २४ तास आवश्यकता नसताना सुरू असतात. त्यामुळे त्याद्वारे दिवसरात्र पाणी सुरू राहिल्याने पाणी वाया जात आहे. अनावश्यक पाणी शेतात तुंबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासन लक्ष देणार का? अशी विचारणा होत आहे.
...............
चौकट...
पाण्याबाबत विरोधाभास
दुर्गम डोंगराळ भागात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना झरे, विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. दोन-तीन किलोमीटरवरून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी आठ दिवसांतून एकदा पाणी येत आहे. अशी परिस्थिती असताना पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या थेंबाचे गांभीर्य पाटबंधारेच्या लक्षात कधी येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com