वाढत्या उष्णतेमुळे दूध संकलनात घट

वाढत्या उष्णतेमुळे दूध संकलनात घट

05569
कोनवडे (ता. भुदरगड) ः येथे दूध संकलन करताना संस्थेचे कर्मचारी व दूध उत्पादक.
..............
वाढत्या उष्णतेमुळे
दूध संकलनात घट

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. १३ : जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने गाय, म्हैस यांच्या दुधाचे उत्पादन खालावले असून, दूध संस्थांच्या संकलनात घट झाली आहे. उष्णतेमुळे दुधाची दुय्यम प्रत, वासाचे (खराब दूध) व रिजेक्ट (कमी प्रत) दुधाचे प्रमाण वाढल्याने संस्थांच्या दूध बिल रकमेत कपात होत आहे.
उत्पादकांकडून घेतलेले दूध आणि संघांना पाठविलेल्या दुधाच्या रकमेत मोठी तफावत आहे. त्यामुळे दूध संस्थांच्या आर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. दूध संघांनी यासाठी उपाययोजना करून संस्थांना वेळेत मार्गदर्शन करून आर्थिक दिलासा देणे गरजेचे आहे. उत्पादकांकडून दूध संस्थांमध्ये फॅट, एसएनएफ तपासून संकलन केले जाते. जमा झालेले दूध संघांना पाठवले जाते. तेथेही दुधाची तपासणी केली जाते. त्यानुसार प्रत ठरवून फॅट, एसएनएफद्वारे दर दिला जातो; पण सद्यःस्थितीत उष्णतेमुळे किंवा कमी फॅट, एसएनएफमुळे दुधाची दुय्यम प्रत, वासाचे, रिजेक्ट दुधामुळे दूध संस्थांना लिटरमागे दोन ते तीन रुपये मिळत आहेत. उत्पादकांना फॅट, एसएनएफ व संघांच्या सरासरी परिपत्रकानुसार दर दिला जातो. त्यामुळे उत्पादकांना द्यावा लागणारा दर आणि संघांकडून येणाऱ्या दूध बिलाच्या रकमेचा मेळ बसत नसल्याने संस्थांना दहा दिवसांची बिले वाटताना तारेवरील कसरत करावी लागत आहे.
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com