मिणचे परिसरात बेसुमार वृक्षतोड : वृक्षसंपदा धोक्यात : पर्यावरणप्रेमींतून नाराजी.

मिणचे परिसरात बेसुमार वृक्षतोड : वृक्षसंपदा धोक्यात : पर्यावरणप्रेमींतून नाराजी.

05583
मिणचे परिसरात बेसुमार वृक्षतोड
वृक्षसंपदा धोक्यात : पर्यावरणप्रेमींतून नाराजी

कोनवडे, ता. ११ : हिरवाईने नटलेला व इको सेन्सिंटिव्ह झोन म्हणून नोंद असतांनाही हेदवडे, शेणगाव, मिणचे, परिसरात राजरोसपणे अनधिकृत बेसुमार जंगलतोड सुरू असून वनविभागाच्या दुर्लक्षामुळं व आर्थिक देवघेवीमुळ औषधी वनस्पतीही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने पर्यावरण प्रेमी मधून संताप व्यक्त होत आहे. मिणचे परिसरातील गावागावात रस्त्यालगत झाडांचे ढीग पडले आहेत. तर वृक्षतोडीमुळे निसर्गसंपन्न परिसर उघडा बोडका झाला आहे.
भुदरगड तालुक्यातील फये, शेणगाव दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो त्यामुळे या परिसरात जंगली प्राण्यांसह औषधी वनस्पतीं जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. हा परिसर घनदाट जंगलाने व्यापला असून वृक्षतोडीमुळे हा हिरवाईने नटलेला परिसर रुक्ष होण्याच्या मार्गावर आहे. भुदरगड तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या फये, मिणचे, हेदवडे, शेणगाव, टिक्केवाडी, नवरसवाडी, पंडिवरे परिसरात अनेक प्राणी, गवे हे प्राणी बेसुमार वृक्ष तोडीमुळे मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. त्यांनी हैदोस घातला आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून यात अनेक जुने वृक्ष आर्थिक देवघेवीतून नष्ट होऊ लागले आहेत. या परिसरात अनेक लाकूड व्यापारी असून त्यांनी तर पैश्यांच्या हव्यासापोटी हा निसर्गसंपन्न परिसर रुक्ष बनवला आहे. परिसरात पक्षी व प्राणी यांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. लाकूड पासच्या नावाखाली आर्थिक देवघेवीतून मोठी तस्करी सुरु आहे. परिसरात शेकडो ठिकाणी तोडलेल्या झाडांचे ढीग पडले आहेत. ते कारवाई करून जप्त करणे आवश्यक आहे. बेसुमार वृक्ष तोड करणाऱ्यांवर वन विभाग कारवाई करणार का ० अशी विचारणा पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

ही वृक्ष संपदा धोक्यात.
निसर्गाचा समतोल राखणारी औषधी वनस्पती तसेच हिरडा, जांभूळ, चंदन, हेळा, निलगिरी, जांभूळ, पिंपळ, उंबर, फणस, आंबा अशा वृक्षाची तस्करी राजरोस वाढली आहे. त्यामुळे जुने वृक्ष व वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. झाडांच्या मुलांवर उठलेले लाकूड व्यापारी आलिशान गाड्यांतून फिरताहेत

कोट
सध्या तापमान ४० डिग्री सेल्सिअसकडे गेले आहे. जीवसृष्टीचा अत्यंत महत्वाचा भाग असलेली झाडेच जर संपली तर मानवी जीवन सुद्धा धोक्यात येईल, एका झाडाची वाढ होण्यास १५ ते २० वर्ष लागतात, त्यामुळे झाडे लावून जगवण्यासाठी सर्व स्तरातून योगदान हवे. वृक्ष तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.
- अवधूत पाटील, पर्यावरणमित्र.

मिणचेसह परिसरात अवैध वृक्षतोड झाली असेल तर वृक्ष तोडणाऱ्या संबंधितांवर वन विभागामार्फत कडक कारवाई केली जाईल.
- मारुती डवरी, वनपाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com