गुरुजींची वाढली पुन्हा डोकेदुखी

गुरुजींची वाढली पुन्हा डोकेदुखी
Published on

16314

गुरुजींची वाढली पुन्हा डोकेदुखी

दुसरा शालेय गणवेश ११० रुपयांत कसा शिवून घ्यायचा ः कापड पंचायत समितीत पडून

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ४ : ‘एक राज्य एक गणवेश’ उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्याचे शासनाचे नियोजन आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पहिला गणवेश बिनमापाचा दिला. पहिल्या गणवेश वितरणाचा घोळ अद्याप कायम असताना दुसऱ्या गणवेशासाठी शाळांना कापड दिले जाणार आहे. सध्याची प्रतिगणवेश शिलाई ६०० रुपये असताना केवळ ११० रुपयांत तो शिवून कसा घ्यायचा, असा प्रश्न गुरुजींसमोर पडला आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटले विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. याबाबत पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्यातील प्राथमिक शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश दिला जातो. यामध्ये मुलांना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचा स्कर्ट दिला जात आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या गतवर्षीच्या मापापेक्षा मोठ्या आकाराचा तयार गणवेश दिला. माप न घेता अंदाजाने दिलेले तयार गणवेश विद्यार्थ्यांना बसत नाहीत आणि विक्रेत्यांकडून गणवेश बदलूनही मिळत नाहीत. त्यामुळे असे बिनमापाचे गणवेश वापराविना पडून आहेत.
विद्यार्थ्यांकडे सद्यःस्थितीत एकच गणवेश असल्याने एक-दोन दिवसाआड धुऊन सलग सहा दिवस वापरावा लागत आहे. ज्या मुलांना गणवेश तोकडे व ढगळे होतात, त्यांनी काय करायचे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. बिनमापाच्या घोळानंतर शासकीय यंत्रणेला जाग आल्याने त्यांच्याकडून आता दुसऱ्या गणवेशासाठी कापड पुरवले जाणार आहे. शाळेने केवळ ११० रुपयांत गणवेश शिवून घ्यायचा आहे. प्रतिगणवेश ६०० रुपये शिलाई घेणारे टेलर ११० रुपयांत गणवेश कसा शिवून देतील? ११० रुपयांत गणवेश शिवून देणारे टेलर शोधण्यासाठी गुरुजींची डोकेदुखी वाढली आहे.
...
चौकट...
दुसऱ्या गणवेशासाठीचे कापड आले आहे. कापड गेले दोन महिने पंचायत समितीत पडून असल्याचे समजते. शिलाईसाठी ११० रुपये दिले जाणार आहेत. एवढ्या कमी शिलाईमध्ये कोणता टेलर गणवेश शिवण्यासाठी तयार होईल? परिणामी दोन महिन्यांपासून हे कापड पंचायत समितीत पडून आहे. मात्र, नेमक्या कोणत्या कारणामुळे कापड पडून आहे, याबाबत तर्कवितर्क उपस्थित होत आहेत.
...
कोट...
नवीन मापे घेऊन शिलाई केलेले गणवेश वाटप सुरू आहे. भुदरगड तालुक्यातील काही केंद्रांमध्ये गणवेश वाटप झाले आहे. दोन दिवसांत मुलांना गणवेश वाटप होईल.
प्रबोध कांबळे, शिक्षण विस्ताराधिकारी, पं. स., भुदरगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com