ऊसतोड मजुरांच्या टोळ्या भुदरगड तालुक्यात दाखल

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या भुदरगड तालुक्यात दाखल

Published on

6352
दारवाड (ता. भुदरगड) ः येथे माळावर ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत.
......
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या
भुदरगड तालुक्यात दाखल

सकाळ वृत्तसेवा.
कोनवडे, ता. १९ : सध्या भुदरगड तालुक्यात ठिकठिकाणी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. मात्र, अद्याप गळीत हंगाम सुरू न झाल्याने हाताला काम नसल्याने मजूर बसून आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केलेल्या ऊसदरावर अद्याप तोडगा न निघाल्याने कारखांची धुराडी पेटलेली नाहीत.
ऊसदर व विधानसभा निवडणुकांची सुरू असलेली रणधुमाळी यामुळे गळीत लवकर सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कर्नाटकातील अनेक साखर कारखाने ऑक्टोबरमध्येच सुरू झाल्याने उसाची पळवापळवी सुरू झाली आहे. चालू गळीत हंगामातील उसाला ३७०० रुपये दर मिळावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत मागणी केली आहे. पण विधानसभा आचारसंहिता सुरू झाल्याने ऊसदराचा निर्णय लांबला आहे. बहुतांश कारखानदार निवडणुकीत अडकल्याने ऊस गळीत हंगाम लांबतच चालला आहे. ऊसतोड मजूर, ऊस उत्पादक, वाहनधारक यांना गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com