

6701
म्हसवे (ता. भुदरगड) ः येथे महिला शिबिरात मार्गदर्शन करताना प्रशिक्षिका अश्विनी वास्कर व उपस्थित महिला.
.............
भागीरथी संस्थेतर्फे म्हसवेत
महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर
कोनवडे, ता. १८ : म्हसवे (ता. भुदरगड) येथे भागीरथी महिला संस्थेतर्फे महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर झाले. घरबसल्या महिलांना काम मिळावे, त्यांना रोजगार उपलब्ध होऊन कुटुंबास आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने नवज्योती महिला बचत गटातर्फे शिबिराचे आयोजन केले होते.
प्रशिक्षका अश्विनी वास्कर यांनी महिलांना भेळ, केक, वॉशिंग पावडर, फिनेल, सेंट, अत्तर, अगरबत्ती, साबण कसे बनवायचे याचे कृती व प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी गावातील महिला उपस्थित होत्या. मनीषा देसाई यांनी स्वागत केले.
प्रतिभा बाळासाहेब देसाई म्हणाल्या, ‘भागीरथी महिला संस्थेचे सामाजिक उपक्रम महिलांना कुटुंबासाठी आधार ठरत असून, संस्थेचे काम प्रेरणादायी आहेत.’
नवज्योती महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा देसाई, प्रतिभा देसाई, प्रिया बाजीराव पाटील, श्वेता देसाई, सुवर्णा देसाई, सई खोत, विद्या गुरव, शोभा शिंदे, सरिता गुरव, दीपा देसाई, जयश्री देसाई, रूपिका देसाई, छाया देसाई, विद्या देसाई, अर्चना गुरव, नलिनी देसाई, उषा देसाई, अर्चना देसाई आदींसह महिला उपस्थित होत्या. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.