गारगोटी येथे दिव्यांग शालेय शिबीर संपन्न : हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅपकडून दिव्यांगाना मिळाले मार्गदर्शन.

गारगोटी येथे दिव्यांग शालेय शिबीर संपन्न : हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅपकडून दिव्यांगाना मिळाले  मार्गदर्शन.
Published on

07000
गारगोटीत मार्गदर्शनपर
दिव्यांग शालेय शिबिर

गारगोटी, ता. २४ : गारगोटीत दिव्यांग शालेय शिबिर झाले. शिबिरात भुदरगड तालुक्यातील अनेक दिव्यांगानी सहभाग घेतला. शाहू वाचनालयाचे सभागृहात झालेल्या या शिबिराचे उदघाटन कुंडीतील झाडाला पाणी घालून झाले.
प्रा.आनंद चव्हाण यांनी स्वागत केले. हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप कोल्हापूर संस्थेबद्दल माहिती युनिटच्या प्रमुख रोशनी देशमुख यांनी करून दिली, तर दिव्यांगाना विविध शासकीय योजना, शिक्षणाच्या संधी व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या संधी याविषयी माहिती पुनर्वसन सहाय्यक तानाजी देसाई यांनी दिली. प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले, ‘‘आज समाजात शरीराने नव्हे तर मनाने आणि मेंदूने अनेकजण अपंग आहेत. त्यांचे अपंगत्व चटकन दृष्टीस पडत नाही; पण तुम्ही शरीराने अपंग असला तरी मनाने सबल व्हा. दिव्यांगांनी अपंगत्वाचा कधीही न्यूनगंड बाळगू नये, आपल्यामधील कुशलता दाखवून द्या.’ शिबिराचा लाभ भुदरगड तालुक्यातील अनेक दिव्यांगांनी घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे, खजानीस शुभम मुंगळे, शाहू वाचनालयाचे कार्यवाह तात्यासाहेब पाटील, ग्रंथपाल प्रवीण गुरव, संस्थेचे संचालक निवृत्त अभियंता नंदकुमार मोरे, बाळासाहेब नाशिककर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com