

09062
लोगो ः रणसंग्राम ग्रामीण फुटबॉल स्पर्धा
युनायटेड, राशिवडे, भिलवडी
फुटबॉल संघ उपांत्यपूर्व फेरीत
सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. २४ : येथील गारगोटी फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असणाऱ्या रणसंग्राम ग्रामीण फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी यजमान गारगोटी असोसिएशन, गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूल, राशिवडे फुटबॉल क्लब, भिलवडी फुटबॉल क्लब यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. येथील मौनी विद्यापीठाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
यजमान गारगोटी फुटबॉल असोसिएशन अ संघाने पट्टणकोडोली फुटबॉल क्लबला २-१ असे नमवून आगेकूच केली. गारगोटीतर्फे विक्रमसिंह आबिटकर यांनी बरोबरीचा तर प्रथमेश कोराणे यांनी विजयी गोल केला. गारगोटी ‘क’ संघाने हसुर आणि सिदनेर्ली संघाला पराभूत करून घोडदौड केली. युनायटेड फुटबॉल स्कूल अ संघाने नवोदित हणमंतवाडीचा ५-० असा पाडाव केला. भिलवडी क्लबने भडगाव तालुका गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनला ४-२ असे पराजित केले. पाचगाव क्लबने युनायटेड ब संघाला १-० असे हरवून रोमांचक विजय मिळवला. राशिवडे क्लबने गारगोटी ब संघाला ४-० असे सहज हरवून उत्कृष्ट खेळ केला. बेकनाळ संघ विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आल्याने पुढे चाल मिळाली. रविवारी सकाळी सेमी उपांत्य फेरी तर सायंकाळी चार वाजता अंतिम सामना होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.