

9923
पुष्पनगर ः येथे तालुकास्तरीय शासकीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वाय. बी. मुसाई, एस. एस. मोरे, दीपक देसाई आदी.
..............
भुदरगड तालुका खो-खो स्पर्धेत
कुमार भवन पुष्पनगरचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. २ : भुदरगड तालुकास्तरीय शासकीय शालेय खो-खो स्पर्धेत कुमार भवन, पुष्पनगरने दमदार कामगिरी करत १४ वर्षे मुले, १४ वर्षे मुली आणि १७ वर्षे मुले अशा तीन गटांत विजेतेपद पटकावले. तसेच १७ वर्षे मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. कुमार भवन पुष्पनगर येथे झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेचा निकाल असा -
१४ वर्षे मुले अनुक्रमे : कुमार भवन पुष्पनगर, मौनी महाराज बनारस हायस्कूल गारगोटी, वाघापूर हायस्कूल. १४ वर्षे मुली : कुमार भवन पुष्पनगर, श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल गारगोटी, जवाहर हायस्कूल निळपण.
१७ वर्षे मुले अनुक्रमे : कुमार भवन पुष्पनगर, शाहू कुमार भवन गारगोटी, कुमार भवन कडगाव. १७ वर्षे मुली अनुक्रमे : श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल गारगोटी, कुमार भवन पुष्पनगर, लक्ष्मी विद्यालय बेगवडे. १९ वर्षे मुले अनुक्रमे : कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी, प. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज मुदाळ, शाहू प्रबोधिनी ज्युनिअर कॉलेज कोनवडे. १९ वर्षे मुली अनुक्रमे : कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक वाय. बी. मुसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी दीपक देसाई, जिल्हा समन्वयक संजय मोरे, विक्रम भोसले, रमेश मगदूम, प्रकाश सांडुगडे , सचिन चौगुले, मनोज देसाई, कासार उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन वाय. बी. मुसाई, मनोज जाधव व स्वप्नील बहादुरे यांनी केले.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.