संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

शाहू हायस्कूलच्या खेळाडूंची निवड
कोल्हापूर, ता. १ ः राजर्षी शाहू हायस्कूलच्या सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. मनपास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये राजर्षी शाहू हायस्कूलमधील लांब उडीमध्ये सिद्धी जाधव प्रथम क्रमांक, सबा परवीन अन्सारी द्वितीय क्रमांक, भालाफेकमध्ये जान्हवी पाटील प्रथम क्रमांक, थाळीफेकमध्ये संस्कृती पाटील प्रथम क्रमांक, गोळाफेकमध्ये शांभवी हिरेमठ द्वितीय क्रमांक, लांब उडीमध्ये १७ वर्षांखालील मुले मेहबूज अन्सारी द्वितीय क्रमांक.
या खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्वांना संस्थेचे अध्यक्ष सुनील साळुखे, खजानीस प्रथमेश साळुंखे, मुख्याध्यापक बी. आर. पाटील, क्रीडा शिक्षक व्ही. एच. भिऊंगडे यांचे मार्गदर्शन मिळाले.