- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

72554
गडहिंग्लज : नादिवेसचा राजा मित्रमंडळाने स्मशानभूमी ची स्वच्छता करून शनिवारी नवीन वर्षाचे स्वागत केले.

स्मशानभूमी स्वच्छतेने
नवीन वर्षाचे स्वागत
नादिवेसचा राजा मित्रमंडळातर्फे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : येथील नादिवेसचा राजा मित्रमंडळाने स्मशानभूमी परिसर व हिरण्यकेशी नदिघाट स्वच्छतेने सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत केले. या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे हे १५ वे वर्ष आहे. या वेळी स्मशानभूमी परिसरात मंडळाने पर्यावरणपूरक जनजागृतीचे फलक लावले.
शनिवारी सकाळी या उपक्रमाच्या आठवणींसाठी व्हाट्स ॲप ग्रुपवर एक संदेश सोडला आणि तासाभरात शेकडो कार्यकर्ते नादिवेस परिसरात जमले. अस्ताव्यस्त लाकडे गोळा करून एका कडेला लावली. परिसरातील गवत झुडपे काढली. स्मशानभूमीत झाडलोट केली. सर्वत्र पसरलेल्या रक्षाचे योग्य विल्हेवाट लावली. नगरपालिकेच्या अग्नीशमन पथकाने स्म‌शानभूमीसह हिरण्यकेशी नदीघाट परीसर धुवून काढला. प्रबोधनपर व संत वचनाचें डिजिटल फलक स्मशानभूमीत लावले.
नदीकाठावरील झाडाखाली लोकांनी टाकलेले फोटो फ्रेम एकत्र करून त्यातील काच व फ्रेमचे साहित्य वेगवेगळे केले. काच पुन्हा वापरात आणण्यासाठी संबंधिताना दिले. मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशीचा एकच नैवद्य असावा आणि मृत व्यक्तींचे अंथरुण-पांघरुण औषधे स्मशानभूमीत टाकू नये, अशा आशयाचा फलक लावण्यात आला. नादिघाट परिसराचीही कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
गेल्या १४ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे राबविला जातो. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत सर्वत्र धुमधडाक्यात सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. परंतु, नादिवेसचा राजा मित्रमंडळाचा हा सामाजिक उपक्रम सर्वांना प्रेरणादायी व आदर्शवत आहे. उपक्रमात मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.