Wed, Feb 8, 2023

राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी
पांडूरंग मोहनगेकर यांची पंच
राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पांडूरंग मोहनगेकर यांची पंच
Published on : 2 January 2023, 11:55 am
72682
पांडुरंग मोहनगेकर
राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी
पांडुरंग मोहनगेकर यांची निवड
कोवाड ः किणी (ता. चंदगड) येथील जयप्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक पांडुरंग मोहनगेकर यांची महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने निवडीचे पत्र दिले आहे. १ ते १२ जानेवारी या कालावधीत राज्याच्या विविध भागांत स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत २१ खेळ प्रकार असून १० हजार ५०० खेळाडू भाग घेणार आहेत. क्रीडा शिक्षक मोहनगेकर हे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ शिक्षक असल्याने आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची पंच म्हणून निवड केली आहे.