पिकाखालील क्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिकाखालील क्षेत्र
पिकाखालील क्षेत्र

पिकाखालील क्षेत्र

sakal_logo
By

भात, सोयाबीनचे क्षेत्र घटले
ऊस क्षेत्रात वाढ; जिल्ह्यातील दहा वर्षांची स्थिती

कोल्हापूर ः जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत भात आणि सोयाबीन पिकांच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. नगदी पीक, इतर पिकांना बसणारा महापुराचा फटका यामुळे गेल्या दहा वर्षांत ऊस लागवडीखालील पिकात मात्र मोठी वाढ झाली आहे. भाजीपाला व केळी उत्पादन खर्चिक आहे. या दोन पिकांचा लागवड खर्च व उत्पादन यात मोठी तफावत निर्माण झाल्याने या पिकांपासूनही शेतकरी लांब गेल्याचे चित्र आहे.
-निवास चौगले


कारणे काय?
-विभक्त कुटुंब पद्धती
-वाढते नागरीकरण
-शेतजमीन बिगर शेती करून विकली तर मिळणारे जादा पैसे
-काही ठिकाणी विविध शासकीय योजनांसाठी जमीन संपादन
-२००५ मधील महापुरानंतर पीक लागवडीचे बदलले सूत्र

चौकट
तृण, कडधान्य लागवडीत मोठी घट
दुसरीकडे खरीप हंगामातील तृण, कडधान्य लागवडीत मात्र मोठी घट झाली आहे. २०११-१२ मध्ये २ लाख ७८ हजार हेक्टर ३१४ हेक्टर क्षेत्रात कडधान्ये व तृणधान्यांची लागवड झाली होती. यावर्षी हीच लागवड १ लाख ९४ हजार ५२९ हेक्टरपर्यंत खाली आली आहे.

चौकट
‘रब्बी’त ज्वारीला पसंती
खरीप हंगामात ऊस क्षेत्राला पसंती मिळत असली तरी रब्बी हंगामात मात्र ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये प्रत्यक्ष पिकांपेक्षा चारा म्हणून ज्वारीची लागवड वाढली आहे. पशुखाद्याचे वाढलेले तर हेही ज्वारी क्षेत्र वाढीमागचे कारण आहे. २०११-१२ साली भाजीपाल्याखाली १९३६ हेक्टर क्षेत्र होते, यावर्षीची भाजीपाला लागवडीची आकडेवारीच उपलब्ध नाही.

.....
चौकट
लागवडीखालील क्षेत्राची तुलना
पिकाचे नाव*२०११-१२ चे लागवडीखालील क्षेत्र (आकडे हेक्टरमध्ये)*२०२१-२२ खालचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
ऊस*१, ४५, ०२४*२,०२,४९२
भात*१, ०१, ५७७*९४, १५०
सोयाबीन*४६, ८२०*४३,४०७
रब्बी ज्वारी*९, ६०२*११,९३६
गहू*६, ५७८*१,४६९
हरभरा*८,१३०*४,७२३
.....
ग्राफ करणे
लागवडीखालील क्षेत्र (आकडे हेक्टरमध्ये)

एकूण तृणधान्ये
२०११-१२ ः २२, ६४२
२०२१-२२ ः १५, ४४०

एकूण कडधान्ये
२०११-१२ ः ९, ९८९
२०२१-२२ ः ५, ७९४

एकूण अन्नधान्ये
२०११-१२ ः ३२, ६३१
२०२१-२२ ः २१,२३४
---
जिल्हा नकाशा वापरणे
दहा वर्षांत येथे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात
आजरा
भुदरगड
चंदगड
गडहिंग्लज

कोट
ऊसाला निश्‍चित हमीभाव मिळतो. साखर कारखान्यांना एफआरपी कायद्यानुसार तो द्यावाच लागतो. पण, भात, भुईमूग यासारख्या अन्य पिकांचा हमीभाव निश्‍चित असला तरी त्यावर व्यापाऱ्यांचे वर्चस्व आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन या पिकांचे भाव कमी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःपुरते भात, सोयाबीन यासारखी पिके घ्यायची आणि उर्वरित क्षेत्रात ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. परिणामी दहा वर्षांत उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत उसाला महापुराचा फटकाही कमी बसतो हेही ऊस लागवड वाढीमागचे कारण आहे.
-प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना