चोरट्यासह मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरट्यासह मुद्देमाल जप्त
चोरट्यासह मुद्देमाल जप्त

चोरट्यासह मुद्देमाल जप्त

sakal_logo
By

L72732
...

टेम्पो चोरणारा १२ तासांत जेरबंद


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः परीख पुलाजवळून चोरीस गेलेल्या टेम्पोचा शोध पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावून चोरट्यास अटक केली. सद्दाम शमशोद्दीन उचगावकर (वय ३३, शिरोळ, ता. हातकणंगले) असे चोरट्याचे नाव असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरलेला सुमारे दोन लाख रुपयांचा टेम्पोही जप्त केला.
पोलिसांनी सांगितले, की परीख पुलाजवळून टेम्पो चोरीस गेल्याची फिर्याद सलीम अल्लाबक्ष बागवान या शहाळे विक्रेत्याने काल शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू केला. यावेळी संशयित शिरोली पुलाची येथे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, पोलिस हेड कॉन्स्टेबल ऋषीकेश पवार, युवराज पाटील, लखन पाटील, सागर माने, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, दिग्विजय चौगुले यांनी तपास केला.
---------