संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

मराठी साहित्य पुरस्कार योजना जाहीर
कोल्हापूर ः करवीर साहित्य परिषदेतर्फे जिल्ह्यातील लेखकांसाठी मराठी कथा, कादंबरी, काव्य व संकीर्ण अशा चार साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार योजना जाहीर केली आहे. १ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती २५ जानेवारीपर्यंत पाठवाव्यात. पुरस्कारप्राप्त पुस्तकांना एक हजार रुपये व सन्मानपत्र दिले जाईल. पुस्तके करवीर साहित्य परिषद, ‘शिवसुंदर’, मोहिते पार्क, रंकाळा, कोल्हापूर- ४१६०११ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी केले आहे.
---------
संत ग्रंथ पुरस्कार योजना जाहीर
कोल्हापूर ः संत गाडगे महाराज अध्‍यासनातर्फे राज्यपातळीवर संत ग्रंथ पुरस्कार योजना जाहीर केली आहे. या योजनेत संत चरित्र, कथा, कादंबरी, काव्य, संशोधन व संकीर्ण ग्रंथांचा समावेश राहील. १ जानेवारी २०२१ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या संत ग्रंथांच्या दोन प्रती २५ जानेवारीपूर्वी पाठवाव्यात. पुरस्कारप्राप्त संत ग्रंथांना एक हजार रुपये व सन्मानपत्र दिले जाईल. ग्रंथ संत गाडगे महाराज अध्यासन, ‘शिवसुंदर’, मोहिते पार्क, रंकाळा, कोल्हापूर- ४१६०११ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी केले आहे.
------------
ब्राह्मण समाजातर्फे धुंदुर्मास सोहळा
कोल्हापूर ः ब्राह्मणसभा करवीर, कोल्हापूर चित्पावन संघ, कऱ्हाडे ब्राह्मण संघ या ब्राह्मण संस्थांतर्फे धुंदुर्मासाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. ८) सकाळी साडेसहाला भगवान श्री सूर्यनारायण पूजन, आरती व प्रसाद होईल. हा सोहळा ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिरजवळ होईल. या सोहळ्यात सर्व पोटशाखांतील ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी गुरुवार (ता. ५)पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ॲड. विवेक शुक्ल, कार्यवाह श्रीकांत लिमये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
---------