
‘साहित्यप्रेमी’चे ग्रामरत्न पुरस्कार जाहीर
72870
‘साहित्यप्रेमी’चे ग्रामरत्न पुरस्कार जाहीर
तारदाळ, ता. ३ : साहित्यप्रेमी युवा मंच व तारदाळ परिसर पत्रकार संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत.
प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्य पुरस्कार पोलिस निरीक्षक अभिजित पाटील, गणेश सोनवणे, ग्रामसेवक बी. डी. कापसे, ए. एस. गडदे, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार इंटरनॅशनल स्कूलच्या माला सूद, आदर्श सरपंच पुरस्कार दीपाली भोकरे (कवठेसार), कलागौरव पुरस्कार दिनकर खाडे, विद्याभूषण पुरस्कार हभप प्रथमेश इंदूलकर, सहकारभूषण पुरस्कार सतीश चौगुले, कलाभूषण पुरस्कार संजय काशीद, प्रशासकीय सेवा पुरस्कार संजय कांबळे, उद्योगभूषण पुरस्कार डॉ. संतोष सुतार, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार विजयकुमार चौधरी, जितेंद्र म्हैशाळे, आदर्श शिक्षिका पुरस्कार रमिला तराळ, अर्चना पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार शांतिनाथ मगदूम, एम. बी. पाटील, स्थापत्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पुरस्कार एम. डी. कुंभार, कृषिभूषण पुरस्कार अमित विभूते, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पुरस्कार अजय डुबल यांना जाहीर झाला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत १५ जानेवारीला पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती साहित्यप्रेमी युवा मंचचे गजानन खोत, दिलीप खोत यांनी दिली.