
संक्षिप्त बातम्या
73352
ॲड. शिवराम जोशी
73353
रामदास रेवणकर
ॲड. शिवराम जोशी यांची निवड
कोल्हापूर : धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी संस्थापक ॲड. शिवराम जोशी (मुडशिंगीकर) यांच, तर उपाध्यक्षपदी रामदास रेवणकर यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अधिकारी मीना वाघ होत्या. २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. संचालकपदी विलासराव पाटील, अनिल चिकोडी, सम्राट बराले, मानसिंग पाटील, ॲड. मीना पोवार, लता कदम, प्रकाश संकपाळ, डॉ. मारुती भोई यांची निवड झाली.
---------
राजर्षी शाहू विद्यानिकेतमध्ये
रविवारी स्नेहमेळावा
कोल्हापूर : जिल्हा परिषद संचालित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवारी (ता. ८) मुस्कॉन लॉन येथे आयोजित केला आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा मेळावा सुरू राहील. या मेळाव्यात १९७५ ते १९९५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. यामध्ये माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होण्याचे आवाहन माजी विद्यार्थी असोसिएशनने केले आहे.
------------
शहा हॉस्पिटलतर्फे अंधशाळेला
वर्षभर मोफत आरोग्यसेवा
कोल्हापूर : निरजा शहा हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलतर्फे ज्ञान प्रबोधन भवन संचालित अंधशाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या वेळी औषधोपचार व शाळेला प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आली. या वेळी २५ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यानिमित्ताने अंधशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार असल्याचे रौनक शहा यांनी जाहीर केले. या वेळी संघवी शहा, डॉ. रवींद्र वराळे, डॉ. वैभव चौगुले, अक्षय सूर्यवंशी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.