
युवकांनी व्यसनापासून दूर रहावे
gad62.jpg
73625
गडहिंग्लज : रवळनाथ हौसिंग सोसायटीतर्फे झालेल्या कार्यक्रमात बोलताना एम. एल. चौगुले. व्यासपीठावर महेश मजती, डॉ. दत्ता पाटील, संदीप पाटील, मीना रिंगणे.
-------------------------
युवकांनी व्यसनापासून दूर रहावे
एम. एल. चौगुले; रवळनाथतर्फे व्यसनमुक्ती सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे एक प्रकारचे व्यसनच आहे. त्यामुळे युवकांनी सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर रहावे. आरोग्याची काळजी घ्या. कठोर परिश्रमाने जीवनात यशस्वी व्हा, असा सल्ला रवळनाथ संस्था समूहाचे प्रमुख एम. एल. चौगुले यांनी दिला.
येथील रवळनाथ हौसिंग सोसायटी, झेप ॲकॅडमी, इंटेट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसन मुक्ती सप्ताह सुरु आहे. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात श्री. चौगुले बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्ञानदीप प्रबोधिनीचे संचालक संदीप पाटील यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. डॉ. पाटील, झेपच्या प्रशिक्षणार्थी सानिका करंबळकर, पूनम पाटील यांची भाषणे झाली. आर. एस. निळपणकर, डॉ. संजय चौगुले, प्रा. विजय घुगरे, उमा तोरगल्ली, रेखा पोतदार, डी. के. मायदेव, डॉ. संजिवनी पाटील, सागर माने, बाबासाहेब मार्तंड आदी उपस्थित होते. मीना रिंगणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. झेपच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. संचालक महेश मजती यांनी आभार मानले.