दौलतचा काटा पारदर्शी
फोटो chd64.jpg
73652
हलकर्णी ः वजन काट्याची पाहणी करताना भरारी पथकाचे अधिकारी.
------------------------------------
‘दौलत-अथर्व’चा वजनकाटा पारदर्शी
चंदगड, ता. 6 ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत- अथर्व कारखान्याचा वजनकाटा पारदर्शी असल्याचा अहवाल वजन काटा तपासणी करणाऱ्या भरारी पथकाकडून देण्यात आला. या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारखान्यावर येऊन वजनकाट्याची तपासणी केली. बैलगाड्या व इतर वाहने काट्यावर उभी करुन त्याचे वजन घेतले. ते योग्य असल्याचे या पथकाकडून सांगण्यात आले. वजन मापे निरीक्षक एम. बी. पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, मंडल अधिकारी अरुण शेट्टी, विशेष लेखापरीक्षक बी. डी. खाडे, पोलिस उपनिरीक्षक हणमंत नाईक यांचा पथकात समावेश होता. वनजकाटा पारदर्शी असल्याचे प्रमाणपत्र कारखाना प्रशासनाकडे देण्यात आले. यावेळी युनिट हेड ए. आर. पाटील, सचिव विजय मराठे, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवण, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, कामगार अधिकारी अश्रू लाड, केनयार्ड सुपरवायझर पी. डी. सरवदे, अमर काकडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.